Areca Imports | आत्मनिर्भर भारत करतोय सुपारीची आयात | Sakal|
देशाच्या सुपारी उत्पादनाची मागणी पूर्ण करता येण्याजोगे सुपारी उत्पादनात देशात होतं. असं असताना सिंगापूर, नेपाळ या सुपारी उत्पादनासाठी ओळखल्या न जाणाऱ्या देशांमधून भारताने ५०८.५९ कोटी रुपयांची २३, ९८८ टन सुपारी आयात केली. २०२१-२०२२ च्या पहिल्या दहा महिन्यात भारताची सुपारी आयात १७,८९० टनांवर गेली असून भारताने त्यासाठी ४६८.१२ कोटी रुपये मोजलेत.या पार्श्वभूमीवर देशात सुपारीचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होत असताना बाहेरून मागवण्यात आलेल्या सुपारीमुळे देशांतर्गत बाजारातील भाव दबावात आल्याची तक्रार कॅम्पकोचे अध्यक्ष किशोर कुमार कोडगी यांनी केली.
#ArecaImports #Maharashtra #India #Marathinews